माझे नाव संतोष भाऊसाहेब काळे. माझे मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील "देहेरे" हे आहे. माझा जन्म ३० नोव्हेंबर १९७९ रोजी माझे आजोळ बेलवंडी येथे झाला आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राहुरी येथील कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दहावी (१९९६) पर्यंत झाले. नंतर बारावीचे (१९९८) शिक्षण नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून झाले. दोन - तीन वर्ष उच्च (१९९९ ते २००१) शिक्षणात अपयश आले. पुढे शिक्षणातील रस कमी झाल्याने पूर्ण करू शकलो नाही. २००१ नंतर छोटा मोठा काहीतरी कामधंदा शोधू लागलो. २००२ पर्यंत माझे कुटुंब वडिलांच्या विद्यापीठातील नोकरीमुळे राहुरीला होते. २००२ पासून गावाकडे कुटुंब आल्यानंतर मी गावातच पतसंस्थेमध्ये काम करू लागलो. तेथेच माझा २६ जून २००४ ला विवाह झाला. जबाबदारी वाढली. कमी पगार असल्याने गाव सोडून बाहेर कामधंदा पाहावा असे वाटू लागले आणि १ जानेवारी २००७ ला गाव सोडून पुण्याला आलो. एक छोटा जोब करून कामाच्या शोधात होतो. फेब्रुवारी २००७ ला नाशिकच्या अशोक बिल्ड्कोन लिमिटेड या बांधकाम क्षेत्रातल्या खासगी कंपनीत काम मिळाले. त्याचवेळी १३ मार्चला मला पहिला मुलगा झाला. त्यावेळी कंपनीचे नगर - औरंगाबाद रोडचे काम चालू होते. तिथे काम करत असताना जास्त पगाराच्या अपेक्षेने एक दोन मित्रांच्या आग्रहाने (ऑक्टोबर २००७) नागपूर ला गेलो. तिथे डी. पी. जैन & इंफ्रास्त्रक्चार कंपनी कडे कामाला गेलो. बरोबर पत्नी व मुलगा होतेच. त्या कंपनीच्या पुलगाव (वर्धा) येथील साईटवर मे २००८ पर्यंत काम केले. विदर्भाचे उन्हाळ्यातील उष्ण वातारण मला व कुटुंबाला सहन होईना. मग पुन्हा पुण्याकडे जोब पाहावा, असे वाटू लागल्याने गावाकडे आलो. गावात राहून काम शोधले. पुण्यात काही जोब मिळाला नाही. मग नगरलाच एम. आई. डी. सी. त काम करण्याचे ठरवून आकाश प्रेसिजन या नावाच्या जोशी नावाच्या बामणाच्या कंपनीत काम केले ( जून २००८ ते मे २०१०). हे काम अंग मेहनतीचे होते आणि मालक बामन कामगारांना पगारही जास्त देत नसे, पण भरपूर काम करून घेत असे. मग हेही काम सोडले आणि रांजणगाव गणपती ( जून २०१० ते ऑगस्ट २०११) येथे येऊन तेच काम असलेला जोब करू लागलो. एक दिवस अचानक माझे शिक्रापूर येथे असलेल्या चुलत्यांचा फोन आला. आणि जणू माझे स्वप्नच पूर्ण झाले. शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या फार्मसी कोलेजवर क्लार्क चा जोब मिळाला. ऑगस्ट २०११ पासून आता सध्या तिथेच काम करत आहे.

          हा झाला माझा जीवन प्रवास. पण जीवनातील काही घटना अशा असतात ज्याने आपले जीवन बदलून जाते, जीवनातील वैचारिक क्रांतीची बाजूहि मी येथे देत आहे. १९९९ ते २००१ या काळात कोलेजला असताना वडिलांशी विचार विनिमय करून राजकारणात प्रवेश करण्याचे ठरविले, आणि शिवसेना या पक्षाची निवड केले. परंतु, त्यावेळी नगर येथे शहरात मराठा सेवा संघाचे नववे राज्यस्तरीय अधिवेशन होते आणि त्यासाठी जिजाऊ रथ यात्रा नगर जिल्ह्यातून फिरत होती. राहुरीत हि रथ यात्रा आली असताना मी या यात्रेच्या संपर्कात आलो आणि मराठा सेवा संघाविषयी माहिती मिळवली. जातीने मराठा असल्याने संघटनेशी बांधला गेलो. त्यानंतर दुसऱ्या वर्षी नगर मधेच मराठा सेवा संघाच्या संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे दोन दिवसीय परिषद होती. यात मी सक्रीय पाने सहभागी झालो. आणि याच्वेकी वाचनाचे महत्व समजल्याने मी काही पुस्तके या ठिकाणी खरेदी केली. ती पुस्तके होती - मा. म. देशमुख यांची राष्ट्र जागृती लेखमाला. या पुस्तकांच्या वाचनाने विचारात फार मोठी क्रांती झाली आणि बहुजन विचारांचे कार्य करण्याचे ठरवून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा कट्टर कार्यकर्ता झालो. आजही सक्रियपणे बहुजन विचारांच्या प्रसाराचे काम करत आहे.